नवी दिल्ली : आयुष विभागाचे केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नवी दिल्लीत मृत्युसमीप रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं झालं.
दिल्लीतल्या लष्करी छावणीतल्या रुग्णालयात हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. यावेळी आयुष मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्यामध्ये एका सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आयुर्वेद आणि योग यांच्या सहाय्याने भारतीय जवानांच्या शारिरिक आणि मानसिक क्षमता वाढेल असा विश्वास यावेळी बोलतांना श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.