औषधी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नवा उच्चांक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या औषधी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान या उत्पादनांच्या निर्यातीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. २०१३ मधल्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा औषध उत्पादनांच्या निर्यातीत १३८ टक्के वाढ झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत औषधी क्षेत्रातला प्रमुख निर्यातदार म्हणून उदयाला येत असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.