बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन ४ कोटी ५७ लाख रुपये लुबाडल्या प्रकरणी १० आरोपींना १ ते ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं १० आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना विविध रकमांचे दंड आणि १ ते ७ वर्षापर्यंत कालावधीचा तुरुंगवास ठोठावला आहे. दोषींमधे २ बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याखेरीज ६ खासगी कंपन्यांनाही दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिकंदराबाद शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन तो निधी इतरत्र वळवून बँकेला ४ कोटी ५७ लाख रुपयांना फसवल्याचा आरोप या १० जणांविरोधात होता. २०१३ मधे या गुन्ह्याची नोंद झाली होती. तर २०१४ मधे आरोपपत्र दाखल झालं होतं.