अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी करण्यात आली.ही चाचणी म्हणजे सैन्याच्या नियमित प्रशिक्षणाचा भाग असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
या प्रक्षेपणाचा पल्ला आधीच निश्चित करण्यात आला होता आणि या चाचणी दरम्यान,सर्व प्रणालींची कार्यक्षमता तपासण्यात आल्याचं मंत्रालयाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं.