देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भारताचे यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन ४४८ दशलक्ष टन एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन झालं आहे. पुढच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत औष्णिक प्रकल्पांसाठीचा कोळश्याचा साठा ४५ टन एवढा वाढवण्यात येईल असं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
देशांतर्गत कोळसा-आधारित संयंत्रांसाठी ३० दशलक्ष टन कोळश्याचा साठा तयार करण्याची मंत्रालयाची योजना आहे. देशांतर्गत कोळश्याचं उत्पादन, वाहतूक आणि गुणवत्तेशी संबंधित मुद्द्यांवर कोळसा मंत्रालय बारकाईनं लक्ष देत आहे.