केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत जीएसटी भरपाई जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, यावर्षी एप्रिल ते जून या काळातल्या थकीत जीएसटी भरपाई पोटी १७ हजार कोटी रुपये आज राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशांना जारी केले. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूला मोठी भरपाई मिळाली आहे. यापैकी महाराष्ट्राला दोन हजार कोटींपेक्षा अधिक तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशला एक हजार दोनशे कोटी, तामिळनाडूला एक हजार नऊशे कोटी आणि कर्नाटकला सुमारे बारा हजार कोटी रुपये मिळाले आहेत. आत्तापर्यत २०२२-२३ या वर्षात जीएसटी भरपाईपोटी एकूण, एक लाख पंधरा हजार कोटी रुपये जारी झाले आहेत.