Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद

मुुंबई : राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद झाली आहे. बहुतेक ठिकाणी ही यंत्रे दुरुस्त करुन, मतदान पूर्ववत सुरु झाल्याचे आमच्या जिल्हा प्रतिनीधींनी कळवलं.

दक्षिण सोलापूर तालुक्यात कालेगाव इथं बूथ क्रमांक 3 च्या मतदान यंत्रणेत दोष निर्माण झाल्यामुळे सकाळी मतदान थांबलं होतं. नंतर ते सुरक्षित सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या चार मतदान केंद्रावरच्या ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे 2 तास मतदान प्रक्रिया बंद होती. वसमत विधानसभा क्षेत्रात परळी दशरे इथल्या मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे दीड तास मतदान बंद होतं.

कळमनुरी शहरातल्या महात्मा फुले मतदान केंद्रातील यंत्र साडे नऊला बंद पडलं. तर सेनगाव तालुक्यात सापडगाव आणि बाभूळगाव इथंही मतदान यंत्रही बंद पडली होती. ती बदलल्यानंतर मतदान सुरळीत होऊ लागलं.

नंदुरबार जिल्ह्यात नवापूर मतदार संघातही ईव्हीएम एक तास बंद होऊ पडल्याचं वृत्त आहे.

Exit mobile version