राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात- अजित पवार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे, असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते.
राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, पवार यांनी, अशा गोष्टींपेक्षा राज्यात महागाई, बेरोजगारी असे अनेक महत्वाचे प्रश्न असल्याकडे लक्ष वेधलं. कर्नाटकातला बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्याची मागणी अनेक वर्षांपासून असल्याचं ते म्हणाले. सीमाभागातल्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासंदर्भात राज्य सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली.