नवी दिल्ली : आधार अर्थात, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1987 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं इतरही काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. बृज राज शर्मा यांची नेमणूक कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी झाली असून, संजीव नंदन सहाय नवीन ऊर्जा सचिव असतील.