Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती केली आहे. या सूचना संबंधित मंत्रालयं आणि विभागांकडे पाठवल्या जातील असं धनखड यांनी सांगितलं. यावर्षी जी-२० परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे असून त्या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे.

भारत जी-२० संघटनेच्या सर्व सदस्य देशांच्या संपर्कात असून, या परिषदेदरम्यान प्रामुख्यानं देशाची विज्ञान क्षेत्रातली प्रगती, तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांती, आणि देशाचा  प्राचीन वारसा  दाखवण्यावर भर दिला जाईल असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितलं.

Exit mobile version