Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लडाख क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन देणं तसंच लष्कराचे जवान आणि अभियंत्यांच्या दुर्गम भागातल्या कामाचं कौतुक करणं हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश असल्याचं सिंग म्हणाले.

काराकोरम इथलं सुमारे वीस हजार फूट उंचावरचं सियाचिन शिखर म्हणजे जगातलं सर्वात उंच  ‘सैन्य तळ’ मानलं जातं. 1984 मधे या परिसरात ‘ऑपरेशन मेघदूत’ राबवण्यात आलं होतं. त्यानंतर हा परिसर भारतीय लष्कराच्या अधिकारात आला. हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र असून पर्यटनामुळे युवकांना लष्कराकडे आकर्षित करायला मदत होईल, असंही सिंग यांनी सांगितलं.

Exit mobile version