जगातल्या इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : वित्त मंत्री निर्मली सीतारामन यांनी आज संसदेत सांगितलं की, इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत आहे. डॉलर्स आणि रुपयामधील चढउतारांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडायला नको यासाठी रिझर्व्ह बँकेनं विदेशी मुद्रा भंडाराचा उपयोग केला असल्याचंही त्यानी सांगितल.
वित्त मंत्र्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं की, जगातल्या विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी भारत एक असून भारतात इतर देशांच्या तुलनेत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक अधिक झाली आहे. आणि भारत सर्वाधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे.