नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स वेगानं रेल्वेगाड्या धावण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प उभारण्यात येतील, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी सांगितलं.
नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय रेल्वे परिषदेचं उद्धाटन करताना यादव बोलत होते. हे पायाभूत सुविधा प्रकल्प चार वर्षात उभे राहतील. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी 160 किलोमीटर्स तर मुंबई-अहमदाबाद या मार्गावरच्या बुलेट ट्रेनसाठी ताशी 320 किलोमीटर वेग गाठण्याकरता सुविधा निर्माण हे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्याच्या रेल्वेगाड्यांचा वेग ताशी 99 किलोमीटर आहे, असंही त्यांनी सांगितलं.