Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत : बाळासाहेब थोरात

मुुंबई : ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे.

मतदान यंत्रात हेराफेरी होऊ शकते अशी जनभावना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी.

तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबात शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशा मागण्या त्यांनी या पत्रात केल्या आहेत.

Exit mobile version