इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी – हरदीप पूरी
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : पेट्रोलचे दर सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती पाहता इतर देशांच्या तुलनेत भारतात हे दर कमी असल्याचं ते म्हणाले. २०२१ ते २०२२ या काळात देशात पेट्रोलच्या किमतीत फक्त २ टक्के वाढ झाली होती, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढल्या होत्या. नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान कच्च्या तेलाच्या सरासरी किमती १०२ टक्क्यांनी वाढल्या, असंही पुरी म्हणाले.
भारतातल्या पेट्रोलच्या किरकोळ किमती केवळ १८ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यांनी आणि डिझेलच्या किमती २६ पूर्णांक ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर देखील कमी केला आहे, तथापि, पाच राज्यांनी सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अद्याप कोणतीही कपात केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.