Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एटीएल मॅरेथॉनसाठी २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला आज सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या एटीएल मॅरेथॉनसाठी आज अटल नवोन्मेष मोहिम आणि निती आयोगानं आज २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला सुरुवात केली आहे. नवोन्मेषासाठीचा हा एक मोठा कार्यक्रम असून त्याद्वारे नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत असते. देशभरातल्या नव्या संशोधकांसाठी आणि प्रकल्पांसाठीची ही स्पर्धा आहे.

गेल्या वेळेसच्या या मॅरेथॉनमध्ये ७ हजार नव्या संशोधकांनी भाग घेतला होता त्यातल्या साडेतीनशे लोकांना भारतातल्या प्रतिष्ठित आस्थापनांमध्ये उमेदवारी करण्याची संधी मिळत असते. यंदाचं एटीएल मॅरेथॉन हे अधिक भव्य असेल, असं या मोहिमेचे संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांनी या मोहिमेची घोषणा करतांना सांगितलं.

Exit mobile version