नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंबईत क्रिकेट मंडळाच्या बैठकीत गांगुली यांनी 39 वे अध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला. त्याबरोबरच मंडळावर सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या प्रशासक समितीचा 33 महिन्याचा कारभार संपुष्टात येईल. गांगुली यांची या पदावर एकमतानं निवड झाली आहे. पुढच्या वर्षी जुलैपर्यंत ते या पदावर काम करतील.