भारत – चीन सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी भारत चीन सीमावादासह विविध मुद्यांवर गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज आज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब झालं होतं.
सकाळच्या सत्रात कॉंग्रेस, डिएमके आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपले मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांची मागणी फेटाळून लावली आणि प्रश्नोत्तराचा तास सुरु करावा कारण, तो अतिशय महत्वाचा आहे असं सभागृहाला सांगितलं. मात्र सदस्यांनी आपली मागणी लावून धरली. गदारोळ कायम राहिल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं.