Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सभागृह सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. समारोपाच्या भाषणात त्यांनी सांगितलं की या अधिवेशनात एकूण १३ बैठका झाल्या. ६८ तास ४२ मिनिटे कामकाज चाललं. सभागृहात ९ विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी ७ विधेयकं मंजूर झाली. या अधिवेशनात सभागृहाची उत्पादकता ९७ टक्के होती, असं त्यांनी सांगितलं. राज्यसभेचं कामकाजही आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं. या सत्रात सभागृदाची उत्पादकता १०२ टक्के राहिल्याचं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं.राज्यसभेनं या अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर केली. ३१ खाजगी विधेयकंही सभागृहात मांडण्यात आली. गोंधळामुळे सभागृहाचं १ तास ४६ मिनिटांचा वेळ वाया गेला, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version