भारत -बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरच चर्चा सुरू करण्याबाबत सहमती
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरात लवकर चर्चा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि बांगलादेशाचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार कराराच्या शक्यतेवर सहमतीनंतर झालेल्या अभ्यासानुसार सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि व्यावसायिक भागीदारीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. या करारामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन दोन्ही देशांमध्ये सामाजिक-आर्थिक विकासाच्या विविध संधी निर्माण होतील. या बैठकीत दोन्ही मंत्र्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.