Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचं सरकारने म्हटलं आहे. येत्या १० वर्षात या क्षेत्रात १६ ते १७ टक्के वाढ अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चंद्र यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितलं. या संदर्भात अलिकडेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमोर सादरीकरण झालं अशी माहिती त्यांनी दिली. या क्षेत्रात देशानं अभूतपूर्व प्रगती केली असून परदेशी गुंतवणूकही आकर्षित केली आहे असं ते म्हणाले.

Exit mobile version