Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

हाफकीन संस्थेकडून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध, सर्जिकल साहित्य आणि यंत्रसामग्री पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संस्थांना १० टक्क्यांवरून ३० टक्के खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version