यंदाच्या वर्षात देशातल्या क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांची घट
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : देशात यावर्षी कर्करोगाच्या रूग्णांच्या संख्येत १८ ट्क्यांनी घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. देशातील क्षयरोग २०२५ पर्यंत संपुष्टात आणणं केंद्रीय आरोग्य विभागाचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत क्षयरोग निर्मूलन प्रकल्प हाती घेण्यासाठी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने केंद्रीय क्षयरोग विभाग, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसोबत सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारतातील मोठ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या सध्या अधिक आहे.