Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मतमोजणी सुरु – महायुतीची आघाडी

पुणे : विभागात भाजपचे १५ उमेदवार आघाडीवर आहे  तर शिवसेनेचे १६ आघाडीवरआहेत.काँग्रेसचे तीन उमेदवार आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, मनसे यांचा एकही उमेदवार आघाडीवर नव्हता. इतर पक्षांचा एक उमेदवार आघाडीवर आहे.

ठाणे कोकण विभागात भाजपचे ९ उमेदवार आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे २१उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचा एकही उमेदवाराला आघाडी मिळाली नाही तरराष्ट्रवादी काँग्रेसचे ५ उमेदवार आघाडीवर आहेत. वंचित आघाडीचा एकही उमेदवारआघाडीवर नव्हता तर मनसेचा एक उमेदवार आघाडीवर होता. इतर पक्षांचे ३ उमेदवारआघाडीवर आहेत.

पश्चिम महाराष्ट्र विभागात भाजपचे २२ उमेदवार आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे १० उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे ७ उमेदवार आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेसचे१२ उमेदवार आघाडीवर आहेत. वंचित आणि मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. इतरपक्षांचे ५ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे ८ तर शिवसेनेचे १० ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत.काँग्रेसचे ८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. वंचित आणि मनसेलाइथंही खातं उघडता आलेलं नाही. तर इतर पक्षांचे २ उमेदवार आघाडीवर आहेत.

मराठवाडा विभागात भाजपचे १५ तर शिवसेनेचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत.काँग्रेसचे ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. वंचितआघाडीचा एक उमेदवार या विभागात आघाडीवर आहे. तर मनसेला खातं खोलता आलेलं नाही. इतरपक्षांचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत. विदर्भात भाजपनं ३९ ठिकाणी आघाडी घेतली असून शिवसेनेचे ७ उमेदवारआघाडीवर आहेत. काँग्रेसला ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ उमेदवार आघाडीवर आहेत.

Exit mobile version