Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेस मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली

नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेस मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. आधीच्या यादीत 190 देशांमधे भारताचा क्रमांक 77 होता.  जागतिक मंदीमुळे भारतीय रिझर्व्ह बँक, जागतिक बँक, आतंरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर मानांकन संस्थांनी भारताच्या आर्थिक विकासवाढीचा दर कमी असेल, असा अंदाज वर्तवला होता या पार्श्वभूमीवर ही यादी जाहीर झाली आहे.

नादारी आणि दिवाळखोरी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे सुधारण केलेल्या पहिल्या दहा देशांच्या यादीत सलग तिसऱ्यांदा भारताचा समावेश झाला आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या अभियानाचा उद्देश परदेशी गुंतवणूकीला चालना देणं, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण भारताची सर्वंकष क्षमता वाढवणं हा आहे, असं जागतिक बॅकेनं या अहवालात म्हटलं आहे.

Exit mobile version