Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला बहुमत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत असून, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनंही गेल्या वेळेपेक्षा चांगलं यश मिळवल्याचं दिसून येत आहे. 288 पैकी 264 जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. भाजपानं आतापर्यंत 92 जागांवर विजय मिळवला असून, शिवसेनेनं 54 काँग्रेसनं 39 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 51 जागा जिंकल्या आहेत. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीनं तीन जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पार्टीनं दोन जागा जिंकल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी, मनसे, जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार आणि माकपा यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांवरुन जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे. ठाकरे यांनी भाजपासह युतीच्या वेळी झालेल्या 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली, तर मुख्यमंत्र्यांनी सत्ता महायुतीचीच असेल असा विश्वास व्यक्त केला. सत्तेसाठी सरकारमधे सामील होण्याची इच्छा 15 विजेत्या बंडखोरांनी आपल्याजवळ व्यक्त केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं.

देशातल्या 17 राज्यांमधल्या 51 विधानसभा मतदारसंघामधे आज पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. सिक्कीमधे 3 मतदारसंघामधे निवडणूक झाली त्यात दोन जागा भाजपाला तर एक सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला मिळाली आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमाग यांनी पो.क. लोक काम रांग मतदारसंघात विजय मिळावला.

हिमाचल प्रदेशमधे भाजपाला दोन्ही जागावर विजय मिळाला. पुदुचेरीमधे कामराजमधे निवडणूक झाली तिथे काँग्रेसच ए. जॉन कुमार निवडणून आले. केरळात पाच ठिकाणी निवडणूक झाली त्यात काँग्रेस आणि मार्क्सवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. मुस्लिम लीगला एके ठिकाणी यश मिळालं.

अरुणाचल प्रदेशमधे खोसा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार चकत अबोह निवडणून आले आहेत. तमिळनाडूमधे विक्रावंडी मतदारसंघात अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाला यश मिळालं. तेलंगणामधे एके ठिकाणीच निवडणूक झाली तिथे तेलंगण राष्ट्र समितीचे एस. सईदी रेड्डी 43 हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात पाच ठिकाणाचे निकाल जाहीर झाले असून, चार ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर एक जागा समाजवादी पार्टीला मिळाली आहे.

बिहारमधे पाच मतदारसंघात निवडणूक झाली त्यातले चार निकाल जाहीर झाले आहेत. दोन जागांवर राजद तर एमआयएम एका जागी यशस्वी झाले आहेत. एके ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. मध्य प्रदेशात झाबुवा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

गुजरातमधे सहा मतदारसंघांमधे निवडणूक झाली त्यातले तीन निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसला दोन जागा तर भाजपाला एक जागा मिळाली आहे. पंजाबमधे सर्व चार ठिकाणाचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसला तीन आणि शिरोमणी अकाली दलाला एक जागा मिळाली आहे.

आसाममधे चार पैकी एका ठिकाणाचा निकाल जाहीर झाला आहे. तो भाजपाच्या परड्यात पडला आहे. राजस्थानमधे काँग्रेसच्या रिटा चौधरी यांनी मांडवा मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर राष्ट्रीय लोक तांत्रिक पार्टीचे नारायण बेनिवाल खिंवसर मतदारसंघात विजयी झाले आहेत. छत्तीसगडच्या चित्रकोट मतदारसंघात काँग्रेसचे राजमन वेंजाम विजयी झाले आहेत.

मेघालयातल्यातल्या एका मतदारसंघात युनाटेडेट डेमोक्रॅटिक पार्टीचा विजयी उमेदवार विजय झाला आहे. साता-यातून उदयनराजे भोसले, आणि परळीतून पंकजा मुंडे यांच्यासह काही अन्य नेत्यांच्या पराभवाची कारणं येत्या काही दिवसात विचारात घेतली जातील, असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

Exit mobile version