Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य परिवहन महामंडळ 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ आजपासून 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार आहे. त्यात चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाईल.अपघाताची कारणं शोधून उपाययोजनांसाठी विविध शिबिरं घेतली जातील.

प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी,वाहतुकीच्या नियमाचं पालन,उत्तम शरीर प्रकृती आणि मानसिक आरोग्य’ या चतुःसुत्रीचं पालन करत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सामान्य जनतेला अपघात-विरहित सेवा देण्याचं आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केलं आहे.

Exit mobile version