अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा तो जवळचा नातलग आहे. भारतात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी तरुणांची भरती करणं आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणं या कामात मक्कीचा हात होता; त्यामुळे भारत आणि अमेरिकेने याआधीच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.
यापूर्वीच मक्कीला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारतातर्फे सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला होता. त्यावेळी चीनने नकाराधिकाराचा वापर करुन प्रस्ताव रोखला होता. मात्र आता एकूण १५ सदस्यांपैकी १४ सदस्यांनी भारताची बाजू घेतल्यानं चीनला नकाराधिकार मागे घ्यावा लागला.