नवी दिल्ली : अझरबैजान बाकू इथं आजपासून सुरु होणाऱ्या १८ व्या गट-निरपेक्ष चळवळीच्या शिखर संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना राजधानी इथं पोचल्या.
दोन दिवस चालणाऱ्या परिषदेला त्या उपस्थित राहणार आहेत. या परिषदेव्यतिरिक्त त्या अन्य सरकारी अधिकाऱ्यांना देखील भेटणार आहेत. या परिषदेत १२० देश सहभागी होणार आहेत.