प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती संरक्षण सचिव गिरिधर अरामने यांनी आज नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली. यात मिलिटरी टॅटू आणि आदिवासी नृत्य महोत्सव, “आदि शौर्य – पर्व पराक्रम का”, वीर गाथा, वंदे भारतम् नृत्य स्पर्धा यांचा समावेश आहे. येत्या २३ जानेवारीला पराक्रम दिवस या कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात होणार असून ३० जानेवारीला समारोप होणार आहे. अधिकाधिक लोकांना सोहळ्यात सहभागी होता यावं या दृष्टीने कार्यक्रम आखले आहेत तसंच चित्ररथांची निवड पारदर्शक पद्धतीने झाली आहे असं गिरिधर यांनी सांगितलं.