नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरच्या चेनानी- नशरी बोगद्याला सरकारनं डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे. या बोगद्याचं हे नामकरण म्हणजे देशासाठी बलिदान देणारे आणि प्रेरणास्रोत असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना वाहिलेली आदरांजली आहे, असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सांगितलं.
गेल्या पाच वर्षात 2 हजार 600 कोटी रुपये खर्चाच्या चेनानी-नशरी बोगद्यासह सुमारे 60 हजार कोटी रुपये खर्चाची पायाभूत सुविधांची कामं सरकारनं सुरु केली आहेत, असं ते म्हणाले.