प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद तीन दिवस चालणार आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे प्रमुख या परिषदेत प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. सायबर क्राईम, पोलीस दलातील तंत्रज्ञान, नक्षलवाद आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासमोरची आव्हानं, क्षमता बांधणी तसेच तुरुंग सुधारणा यासह इतर विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे.