जल जीवन अभियानानं ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): ग्रामीण भागात घरोघरी नळानं पाणीपुरवठा करण्याच्या जल जीवन अभियानाने ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबद्दल सर्व संबंधितांचं अभिनंदन केलं आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रधानमंत्र्यांनी या अभियानाची घोषणा केली होती. २०२४ पर्यंत देशातल्या सर्व घरांमधे नळानं पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे.