Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण – लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण आहे, असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जम्मू काश्मीर अंतर्गत गिलगिट – बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरसह सर्व भाग हा संपूर्ण राज्याचा भाग असल्याचं ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानवर आमच्या पश्चिमेला असणाऱ्या अवैधपणे कब्जा केला आहे. असं रावत यांनी सांगितलं.

जगातली सर्वोत्कृष्ट रायफल एसआयजी सौर ही रायफल या वर्षीच्या अखेरपर्यंत अमेरिकेकडून भारतीय सैनिकांना उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Exit mobile version