Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘कयार’ वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीला फटका, मुंबई आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘कयार’ वादळाचा फटका सिंधुदुर्ग किनारपट्टीला बसला आहे.

आज सकाळी मालवण, देवबाग, आचरा तसच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घुसलं आहे. देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घातला असून, ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. मोठ्या लाटांसंह वारा आणि पावसाचा जोरही वाढला आहे. आचरा इथं जामडुल बेटावर पाणी भरल्यानं बेटावरच्या विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत, त्यामुळे इथं पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.

जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यात पडझडीच्या अनेक घटना घडल्या असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी, जालना, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली.

Exit mobile version