Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबाद इथं सुमारे ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उदघाटन

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबाद इथं  सुमारे ८०० कोटी रुपयांच्या  विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन आणि भूमिपूजन केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं गरिबी कुटुंबांसाठी १० कोटी शौचालयं बांधली आहेत. असं शाह यांनी यावेळी सांगितलं. ६० कोटी नागरिकांपर्यंत गरिबांसाठी घरं, स्वयंपाकाचा गॅस, वीज, बँक खाती आणि आरोग्य सुविधा पोहोचवण्याचं उद्दिष्ट नरेंद्र मोदी सरकारनं ठेवल्याचं त्यांनी सांगितलं.

शहरी गरिबांसाठी सरकार पायाभूत सुविधा पुरवत असून अहमदाबाद  इथं दिवाळीपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साडेचार हजार घरं गरिबांना वितरीत केल्याची माहिती शाह यांनी यावेळी दिली.

Exit mobile version