भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला ते आज संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शहर नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं ते म्हणाले. वाहतूक तसंच पायाभूत सुविधांचं नियोजन आणि जलव्यवस्थापन ही महत्त्वाची क्षेत्रं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. शहराच्या विकासाबरोबरच मानवकेंद्री विकासही सुनिश्चित केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.