आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक महानगरपालिकेत अपंगांसाठीच्या निधीचं विनियोजन योग्यप्रकारे होत नसल्याबद्दल २०१७ मधे प्रहार संघटनेतर्फे आंदोलन करीत असताना कडू यांची तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी बाचाबाची झाली होती. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानास्पद बोलणे अशा आरोपांसाठी कडू यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर कडू यांनी ताबडतोब वरिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.