मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. या शेतकऱ्यांना तत्काळ मदत सरकार जाहीर करत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आवश्यक मदत देईल, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सरकारनं तातडीनं पंचनामे सुरू केले, काही काम अद्याप बाकी आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला मदत देऊ, विरोधकांनी राजकारण यावर करू नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला.