महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शनं
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे यासह विविध मागण्या हे आमदार करत होते.