लैंगिक समानता वाढवण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज – राष्ट्रपती
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याच्या गरजेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींनी भारतीय महिलांच्या भावनेवर ‘तिची कथा- माझी कथा- मी लैंगिक समानतेबद्दल आशावादी का आहे’ हा लेख लिहिला आहे. शांतातपूर्ण आणि समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी खोलवर रुजलेले लैंगिक पूर्वग्रह ओळखून ते दूर केले पाहिजेत असंराष्ट्रपतींनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
सामाजिक न्याय आणि समानतेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं नमूद करून त्यांनी लैंगिक पूर्वग्रह आणि चालीरीती कायद्याद्वारे किंवा जनजागृतीच्या माध्यमातून दूर केल्या जात असल्याचं म्हटलं आहे. भारतीय महिला आणि समाजाची जिद्द ही आपल्याला भारत हा जगात लैंगिक न्यायासाठी महत्वाचा देश म्हणून पुढे येत आहे याबद्दल आत्मविश्वास देते असं त्यांनी म्हटलं आहे.