भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणखी वाढवण्यासाठी उत्सुक – श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणखी वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचं श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. दोन्ही देश परस्परांबरोबर कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातलं सहकार्य सुधारण्यासाठी काम करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. भारत आणि श्रीलंके दरम्यानच्या विमान आणि प्रवासी बोट सेवेच्या विस्तारामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांचे परस्पर संबंध आणखी सुधारतील, असं ते म्हणाले. नवीकरणीय ऊर्जा हे दोन्ही देशांमधल्या सहयोगाचं संभाव्य क्षेत्र असून, त्रिनकोमाली हे ऊर्जा केंद्र म्हणून विकसित होऊ शकतं, असं ते म्हणाले.