मुंबई : नव्या मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी राज्याच्या मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घ्यावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घेऊन आमदारांनी विकासकामं करावी, असंही संभाजीराजे यांनी यांनी म्हटलं आहे.
खासदार आणि राजकीय नेता अशी फक्त ओळख असण्याऐवजी किल्ले संवर्धन करणारा अशी माझी ओळख भविष्यात व्हावी, असं त्यांनी सांगितलं. रायगड पूर्वी जसा होता, तसा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, किल्याच्या संवर्धनासाठी ६०० कोटी मंजूर आहेत, तर अन्य १० किल्ल्यांसाठी आणखीन १०० कोटी केंद्राकडून मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
छत्रपती उदयनराजे यांचा पराजय म्हणजे तो आमचा पण पराजय आहे, असं सांगत आजचा पराजय हा उद्याचा विजय कसा असेल याचा छत्रपती उदयनराजे नक्की विचार करत असतील, असं संभाजीराजे म्हणाले.