उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या दृष्टीने केंद्र सरकारकडून एक विशेष पोर्टल सुरु
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या दृष्टीने केंद्र सरकारनं एक विशेष पोर्टल सुरु केलं आहे. केंद्रीय वीज मंत्री आर के सिंग यांनी काल दूरस्थ पद्धतीने या पोर्टलचं उद्घाटन केलं. हाय प्राईस डे अहेड मार्केट आणि सरप्लस पॉवर पोर्टल असं या पोर्टलचं नाव असून त्यामुळे वीजपुरवठादार अवाजवी दर आकारु शकणार नाहीत, असं वीज मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. गॅस आणि कोळशावर चालणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांवर भर द्यावा असंही पत्रकात म्हटलं आहे.