भारत आणि अमेरिका परस्परांमध्ये धोरणात्मक व्यापार संवाद करण्यासाठी सहमत
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारत आणि अमेरिका परस्परांमध्ये धोरणात्मक व्यापार संवाद करण्यासाठी सहमत झाले असून, केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे परराष्ट्र सचिव आणि अमेरिकेच्या वाणिज्य विभागातील उद्योग आणि सुरक्षा विभागाचे उपसचिव या धोरणात्मक व्यापार संवादाचं नेतृत्व करणार आहेत. दोन्ही देशांमधील निर्यात नियंत्रण, उच्च तंत्रज्ञानविषयक व्यापार वाढविण्याचे मार्ग शोधणे तसंच तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करणे यावर या संवादात लक्ष केंद्रित केलं जाणार आहे