कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रदान
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात काल रात्री हा सोहळा पार पडला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे. मूलभूत आनंद हे भावाचं रुप असून अभावापासून कोणतंही सत्य निर्माण होऊ शकत नाही असं आशा बगे यांनी मनोगतात सांगितलं. अनेक मराठी दिग्गज साहित्यिकांच्या पाठोपाठ गुणवत्ता लोप होईल असं वाटत असतानाच आशा बगे यांचं साहित्य नावारूपाला आलं असं मत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी यावेळी व्यक्त केलं तर ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांनी आशा बगे यांचं साहित्य हे समीक्षकांच्या कप्प्यांमध्ये बसणारं नसल्याचं सांगितलं.