Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोरीत निघाल्याच्या पार्श्र्वभूमीवर अमेरिकन बँकिंग प्रणालीच्या सुरक्षेसाठी आवश्यक कारवाई करण्याचं अध्यक्ष ज्यो बायडन यांचं आश्र्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन बँकिंग प्रणालीची सुरक्षा निश्चित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे वचन दिले आहे.बायडन यांनी बाजार आणि ठेवीदार यांना आश्वस्त कऱण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन्ही बँकांमधील ठेवींची हमी देण्यासाठी आणीबाणीच्या उपाययोजना केल्यानंतरही, जगभरातल्या इतर बँकांबाबत असलेली गुंतवणुकदारांची चिंता दूर कऱण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.अमेरिकेतल्या प्रमुख बँकांचे शेअर बाजारात 70 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये या बँकांना 170 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला आहे.

Exit mobile version