सैनिकांसाठी उपयुक्त स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं सैन्य दल प्रमुख अनिल चव्हाण यांचं मत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत सैनिकांना वापरण्यास सुलभ असलेल्या शस्त्रांची निर्मिती करताना सैनिकांच्या शारिरिक क्षमतेचा विचार करुन या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं मत सैन्य दल प्रमुख अनिल चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ह्यूमन फॅक्टर्स इनजिनिअरिंग इन मिलिटरी प्लॅटफॉर्म या विषयावर आधारित एका कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या क्षेत्रात सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि धोरणात्मक चौकट तयार करायला हवी असंही ते म्हणाले. समावेशक शस्त्र निर्मितीच्या विकास प्रक्रियेत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरिंगचा वापर करण्यासाठी डीआरडीओ घेतल असलेल्या पुढाकाराची माहिती यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी दिली. ही उत्पादनं केवळ भारतीय सैन्यासाठीचे नव्हे तर ती निर्यातीसाठीही उपलब्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.