नवी दिल्ली(वृत्तसंस्था): ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्या टर्की इथल्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरेना मधल्या ६१ दिवसांच्या प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलनं मंजुरी दिली आहे.
नीरज चोप्रानं गेल्या वर्षी देखील या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. येत्या १ एप्रिल रोजी तो प्रशिक्षणासाठी टर्की इथं रवाना होणार असून, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम च्या टॉप्स योजने अंतर्गत या प्रशिक्षणाचा खर्च उचलला जाणार आहे.