अमेरिकेतील भारतीय दुतावासावर खलिस्तानी उग्रवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेकडून निषेध
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं, खलिस्तानवादी उग्रवाद्यांनी भारतीय वकिलातीवर केलेल्या हल्ल्याची अमेरिकी सरकारने निंदा केली आहे. आपल्या हद्दीत असलेल्या राजनैतिक अधिकार्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असून, असली विध्वंसक कृत्य खपवून घेतली जाणार नाहीत असं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हंटल आहे. या हल्ल्यासंदर्भात भारताने तीव्र निषेध नोंदवल्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली आहे.
या संदर्भात अमेरिकेच्या भारतातील दूतावासातील अधिकर्यांसोबत बैठक घेऊन, अमेरिकी सरकारला राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षण आणि सुरक्षेच्या मुलभूत कर्तव्यांची आठवण करून देण्यात आली. तसंच अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आवश्यक ती उपाय योजना करण्यासही अमेरिकी सरकारला सांगण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.